पंतप्रधानांना हे शोभत नाही

0

नवी दिल्ली-पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणे शोभत नाही आणि हे देशासाठी चांगली गोष्ट नाही अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. आजपर्यंत आपल्या देशातील कोणत्याही पंतप्रधानाने पंतप्रधान कार्यालयाचा वापर करत विरोधकांवर टीका केलेली नाही. पण नरेंद्र मोदी हे रोज करत आहेत. पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणं शोभत नाही आणि हे देशासाठी चांगली गोष्ट नाही अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले. मोदी सरकारचं आर्थिक व्यवस्थापन सर्वसामान्य लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास हळूहळू कमी करत आहे. काही दिवसांपुर्वी अनेक राज्यांमध्ये निर्माण झालेला चलन तुटवडा नक्कीच रोखता येणे शक्य होत अस मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

जीएसटीची अंमलबजावणी आणि नोटाबंदी ही मोदी सरकारची दोन मोठी आश्चर्य आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेच प्रचंड मोठं नुकसान झालं ज्याचा फटका छोट्या आणि मध्यम उद्योजकांना बसला आणि हजारो नोकऱ्याही गेल्या अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.