हैद्राबाद: भारताचा पारंपारिक खेळ असलेल्या कब्बडीच्या सामन्यांना आज पासून हैदराबाद येथी सुरुवात होत आहे. यासामन्याची सुरुवात दणक्यात होणार आहे. २० जुलै ते १९ ऑक्टोबर पर्यंत हे सामने खेळले जाणार आहेत. या हंगामात १ कोटी ४५ लाख रुपये बोली लावलेला सिद्धार्थ देसाई तेलगु टायटन्स कडून खेळणार आहे. तो गेल्या हंगामात यु मुंबा संघाकडून खेळला होता.
सुरुवातीचा सामना यु मुंबा आणि तेलगू टायटन्स मध्ये हैद्राबाद येथील गच्चीबोली स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार इराणी असून, यु मुंबा चा फझल अत्राचली तर तेलगु टायटन्सचा अबोझार हे एकमेकांना आव्हान देणार आहेत. यंदाच्या सिझन मध्ये बाहुबली म्हणून सिद्धार्थ देसाईला ओळखले जात आहे. सगळ्यांचे लक्ष त्याच्या खेळाकडे लागले आहे. इराणच्या फझलला ‘सुलतान’ ही नवी ओळख देण्यात आली आहे.
यंदाच्या स्पर्धेत एकूण ७२ सामने होणार आहेत. हैदराबाद, मुंबई, पाटणा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, पुणे, जयपूर, पंचकुला, ग्रेटर नॉएडा अशा १२ शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत.