प्रांताधिकार्‍यांनी दिली आदिवासी पाड्यावरील मुलांना मायेची सावली

0
फैजपूर- अधिकारी येतात अन् जातातही मात्र त्यातील काही मोजक्याच चांगले काम करणार्‍यांचे काम जनता लक्षात ठेवते. त्यातील एक अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी अजित थोरबोले. आदिवासी भागातील पाड्यावर त्यांनी भेटी दिल्या.  लहान मुलांना पाहून प्रांताधिकारी डॉ.थोरबाले यांनी उन्हाच्या उकाड्यात शरीराला गारवा वाटावा म्हणून सर्वांना कुल्फी खाऊ घालून मायेची सावली दिली. या मायेच्या सावलीने लहान मुलाच्या चेहर्‍यावर आनंद फुलला.
कुल्कीने उजळले चिमुकल्यांचे चेहरे
फैजपूर उपविभागाचे अधिकारी डॉ.अजित थोरबाले हे आपल्या शासकीय वाहनाने गाडर्‍या, जामन्या, लंगडा आंबा, उसमळी व इतर पाड्यावर जावून आले.  रस्त्याने जात असतांना त्यांना रस्त्यात एक कुल्फीची गाडी दिसली आणि त्या गाडीजवळ दहा-पंधरा मुले उभी होती पण या मुलांमधून फक्त तीन ते चार मुले कुल्फी खात होते आणि बाकीची मुल त्यांच्या तोंडाकडे बघत होते.
शासकीय गाडीत बसलेले प्रांताधिकारी डॉ.थोरबाले यांची नजर त्या मुलांकडे पडली आणि लागलीच गाडी चालकाला थांबवायला लावली. डॉ.थोरबाले हे त्या लहान मुलांकडे गेले आणि त्यांना विचारले कि तुम्ही कुल्फी का खात नाही ? यातून एकही मुलाने उत्तर दिले नाही. डॉ.थोरबाले यांच्या लक्षात आले की यांना कुल्फी खायची आहे पण यांच्याजवळ पैसे नसल्याने ही गरीब मूले खाऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी कुल्फी स्वतः घेऊन त्याच्या हातात दिली. प्रत्येक मुलाने कुल्फी ही आवडीने खाल्ली आणि त्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसला तो कुठेही गगनात न मावणारा होता.