मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

0

मुंबई: गेल्या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा एकदा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलि आहे. वांद्रे, अंधेरी, माटुंगा, चेंबूर, मुलुंड मध्ये पावसाने जोर धरला आहे. येत्या दोन तासात मुंबई सह ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्या मुळे येणारे दोन तास हे अति महत्वाचे आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवा, कल्याण, भागात रात्री पासून पाऊस पडत असून, भिवंडीत पावसामुळे काही घरात पाणी शिरले आहे. नव्या मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली असून, सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने मध्य रेल्वेची सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकातल्या फलाट क्रमांक १ वर असलेल्या ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने धीम्या मार्गाची डाऊन लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारी सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने निघालेल्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसतो आहे.