दहिगाव च्या सुरेश आबा नगरातील प्रमुख रस्ता बंद करून रहिवाशांची झाली गैरसोय ग्रामपंचायतीने त्वरित रस्ता मो कळा न केल्यास रहिवाशी उपोषण करणार 

दहिगाव प्रतिनिधी l

दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील प्रमुख रस्ता अडवून रहिवाशांची गैरसोय करण्यात आली आहे हा रस्ता त्वरित मोकळा न केल्यास रहिवासी या आठवड्यात उपोषणाला बसणार आहेत असा इशारा त्यांनी दिला आहे गेल्या 30 ते 35 वर्षापासून गावठाण विस्तारीकरणातील नऊ फूट रुंदीचा हा रस्ता येथील एक प्लॉट खरेदी करणाऱ्याने अडवून टाकला आहे त्यामुळे रहिवाशांना येजाण्याचा मार्ग राहिलेला नाही याबाबत ग्रामपंचायतला रहिवाशांनी तक्रारही केलेली आहे ग्रामपंचायतीने त्वरित हा रस्ता मोकळा न केल्यास रहिवासी या आठवड्यात उपोषणही करणार आहेत 19 ९७ व ९८ मध्ये येथे गावठाण विस्तारीकरणात सुमारे 75 प्लॉट टाकण्यात आलेले आहेत या प्लॉट ची सन 2015 16 मध्ये चौकशी करून गैरवापर करणाऱ्यांवर कारवाही करण्यात आलेली होती यातीलच कारवाई करणाऱ्या मधील काही लोकांनी पुन्हा या जागांचा खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे हा व्यवहार कोणत्या पद्धतीने व कसा करण्यात आलेला आहे याबाबतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही रहिवासी करीत आहेत शासनाने वितरित केलेल्या या गावठाण प्लॉट विक्री करता येत नाहीत असा शासनाचा नियम आहे मात्र हा या नियमाचे उल्लंघन करून संबंधित अधिकाऱ्यांनी प्लॉट्स खरेदी-विक्रीचे परवानगी कशी दिली हा प्रश्न मात्र रहिवाशांमध्ये भेडसावत आहे काही धनाड्य लोक त्यांचा धनशक्तीचा उपयोग करून गोरगरीब लोकांची पिळवणूक करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे तरी शासनाच्या पद्धतीने मोजून वितरित कराव्यात आणि रहिवाशांना रस्ता द्यावा अशी मागणी मात्र त्रस्त रहिवासी व महिला करीत आहेत