यावल- आदिवासी एकता परिषदेच्या वतीने विविध 16 मागण्यांकरीता बुधवारी अधिकार मोर्चा काढण्यात आला. 43 डिग्रीहून अधिक तापमानात दुपारी 12 वाजता आदिवासी प्रकल्प कार्यालयापासून थेट तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघालाफ यात मोठ्या संख्येत आदिवासी महिला, पुरूष, अबालवृध्दांनी यात सहभागी होत घोषणा दिल्या.
स्वातंत्र्यानंतर आजही आदिवासी त्यांच्या विविध अधिकारांपासून वंचितच आहेत. शासनाच्या विविध योजनांकरीता त्यांना लढा द्यावा लागतो हे प्रामुख्याने शासनकर्त्यांच्या निदर्शनास यावे म्हणून आदिवासी एकता परीषदेच्यावतीने बुधवारी विविध 16 मागण्यांकरीता अधिकार मोर्चा काढण्यात आला.
यांचा मोर्चात सहभाग
बुरूज चौकातुन पुढे भुसावळ टी-पॉइंटपर्यंत व तेथून तहसील कार्यालयासमोर मोर्चा धडकला. येथे परीषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी मोर्चेकर्यांना मार्गदर्शन केले. शासनाकडील मागण्यांसंदर्भातील लढ्याची माहिती दिली. तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ अहिरे, यशवंत आहिरे, मुकेश वाघ, दिलीप सोनवणे, रामभाऊ ठाकरे, भगवान मोरे, किरण सोनवणे, राजू गायकवाड, अशोक भिल, देविदास भिल, करण सोनवणे, संतोष भील, रायसिंग सोनवणे, रमजान तडवी, सुनील भीलसह मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.