राज्यातील शिंदे सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार

भुसावळला आयोजित मेळाव्यात आ. एकनाथराव खडसे यांची स्पष्टोक्ती

भुसावळ  प्रतिनिधी ।

ज्यातील शिंदे सरकारने शेतकरी हिताचे कोणतेही राज्यातील पहिले नाही. शिवाय सहा झालेल्या गारपीटीचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार असल्याची स्पष्टोक्ती आ. एकनाथराव खडसे यांनी केली. भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील वांजोळा रस्त्यावरील मौर्या मंगल कार्यालयात शुक्रवारी, २१ रोजी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार सावकारे यांच्यावर टिका करताना खडसे म्हणाले की, मी निधी देणार नाही, अशी अफवा पसरवली जात आहे. मात्र, मी आगामी सहा वर्षांसाठी आमदार असल्याने विकासकामांसाठी निधी देणार असल्याने चिंतेचे कारण नाही. सत्ताधारी आमदारांमधील असंतोष वाढू नये म्हणून मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही, अशी टिकाही त्यांनी केली. धमक्या देवून निवडणुकीसाठी उभे केले उमेदवार : माजी आमदार संतोष चौधरी

 मी व खडसे एकत्र आल्याने भविष्यात शहरातील दडपशाही संपणार आहे. कृउबा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते ठेकेदार आहेत. त्यांनाही धमक्या देवून उभे केले आहेत. तुमचे ठेके बंद करू, अशा धमकी देण्यात आल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी केला. गेल्या काळात ६० लाखातून बाजार समितीत काळ्या मातीवर काँक्रिटीकरण झाले ते अद्याप टिकून आहे. मात्र, शहरासह तालुक्यात कोट्यवधी खर्चून सहा महिन्यात रस्ते खिळखिळे झाल्याचे ते म्हणाले. बाजार समितीत चार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो. मात्र, प्रत्यक्षात एक कोटींची कामे झाली नाहीत. त्यामुळे चार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.

… तर विधानसभेतही आमदार बदलणार »» कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आमदारकीची चाचणी आहे. या निवडणुकीतील निकालावर आगामी निवडणुकांचे यश अवलंबून आहे. विधानसभेतही आमदार बदलतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.व्यासपीठावर यांची होती उपस्थिती »» व्यासपीठावर कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी,

ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगरसेवक प्रा. सुनील नेवे, आशिक खान शेर खान, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे (फेकरी), नितीन धांडे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.