भरधाव ट्रॅक्टर नागरिकांच्या वस्तीत शिरला

| जळगाव प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील भडगाव आमडदे येथे गुरुवारी पहाटे वाळूची चोरटी वाहतूक करणारा भरधाव ट्रॅक्टर नागरिकांच्या वस्तीत घुसला. या दुर्घटनेत एका ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. वैशाली बालू सोनवणे वय ११ असे बालिकेचे नाव आहे तर बानूबाई वाघ ( वय ४२) हो महिला आणि पिंकी सोनवणे (वय ५) हे चिमुकली जखमी झाली आहे. ट्रॅक्टरच्या पडकेत घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. या घटनेने मोठी होती. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा वासाठी आमडदे येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

बालिकेचा मृत्यू, दोघे जखमी; आमडदेची घटना

बालिकेचा मृत्यू झाला असून बानूबाई वाघ ही महिला आणि पिंकी सोनवणे ही चिमुकली जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोषी ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळी आपले वाहन सोडून फरार झाला आहे. वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आजची दुर्घटना घडल्याचा आरोप आमडदेकरांनी केला आहे. या दुर्घटनेतील ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली नसली तरी कुठे तरी वाळू खाली केल्याचे दिसून येत आहे. वाळू खाली केल्यानंतर भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवल्यामुळे ही भयंकर घटना घडल्याचे सांगितले जात आहे.