तारांवर झालेला झाडांच्या फांद्या विळखा काढणेबाबतचे निवेदन तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून उप अभियंता तिरुपती पाटील यांना देण्यात आले
प्रतिनिधी तळोदा l
विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झालेला झाडांच्या फांद्या विळखा काढणेबाबतचे निवेदन तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून उप अभियंता तिरुपती पाटील यांना देण्यात आले
निवेदनात असे म्हटले आहे शहरात विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांच्या फांद्याचा विळखा पडता आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी विद्युत तारांवर आलेल्या झाडांची छाटणी करण्याची गरज आहे. जेणेकरुन वादळामुळे या तारांमध्ये फांद्या अडकुन त्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा तसेच जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मान्सुन सुरु होण्यापुर्वीचे दरवर्षी नालेसफाई करणे, विद्युत तारांमध्ये अडकत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, अशा उपाय-योजना करण्यात येतात. वादळी पावसामध्ये विद्युत तारांमध्ये झाडांच्या फाद्या अडकुन विद्युत तारा तुटल्यास विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी महावितरणकडुन फांद्या तोडण्याची मोहिम हाती घेण्यात येते. परंतु सध्या ही मोहित अतिशय संथ गतीने शहरामध्ये सुरु आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांश ठिकाणी रस्त्यावर विद्युत तारांना झाडांचा विळखा पडल्याचे चित्र दिसत आहे. विज पुरवठा करणाऱ्या तारा या एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होण्याचा धोकाही वाढला आहे. तरी महावितरणने लोंबकलेले विद्युत तार खेचुन प्रेशर (ब्याटम) देऊन होणारी संभाव्य दुर्घटना टाळावी हि विनंती.