जळगाव – जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून चार पैकी तीन जागांवर काँग्रेसचा विजय झाला. मागीलवेळी बँकेत एकच संचालक होता, आता तीन झाल्याने काँग्रेसची ताकद वाढली असल्याचा दावा आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारhttps://wp.me/p8nmZI-V7g यांनी पत्रकार परिषदेत केला.
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 20 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. त्यात काँग्रेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. जागा विजयी झाल्यानंतर काँग्रेस भवनात जल्लोष करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील, शैलजा निकम, जनाबाई महाजन आद उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगीतले की, पक्षाच्यावतीने चार जागा मागण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय खेळी झाल्याने चोपड्याची जागा लढवता आली नाही. परंतु तीनही जागांवर पक्षाने विजय संपादन केला. पुर्वी एकच जागा होती आता तीन संचालक झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
राजीव पाटलांकडून विश्वासघात – महाजन
महाविकास आघाडीच्या रावेर येथील उमेदवार जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. पक्षाने उमेदवारी दिलेली असताना त्यांनी माघार न घेतल्यामुळे जाहीर माघारीची घोषणा केली. यादरम्यान पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भुमीका बजावली जात असल्याने गनिमी काव्याने निवडणूक लढवत विजय संपादन केल्याचे त्यांनी सांगीतले.