सुप्रीम कोर्टाने आता सत्तासंघर्षावर दिलायं शेवटचा अल्टीमेटम..

पिंपरी |  एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या असे निर्देश देत सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहेत.

आम्ही निकाल देऊन इतके दिवस झाले आहेत तुम्ही काहीही निर्णय का घेतला नाहीत? असं म्हणत राहुल नार्वेकर यांना सरन्यायाधीशांनी सुनावलं आहे. राहुल नार्वेकरांच्या वतीने तुषार मेहतांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी वेळ वाढवून मागितला. मात्र वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. LiveLaw ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

अजित पवार आणि इतर आमदारांचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घ्यावा तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबर पर्यंत घ्यावा. असे निर्देश आता डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले आहेत. तसंच डी. वाय चंद्रचूड असंही म्हणाले की अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हाला अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदेंविरोधातल्या ३४ याचिकांवर ३१ डिसेंबरच्या आत निर्णय घ्या. तुषार मेहतांनी युक्तिवाद करत दिवाळीच्या सुट्टीचा मुद्दा मांडला, हिवाळी अधिवेशन हा मुद्दाही मांडला. तरीही सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत दिली आहे. तर अजित पवार यांच्याबाबतची डेडलाईन ही ३१ जानेवारी ही ठरवून दिलं आहे.

मी निकाल ऐकलेला नाही. मात्र अध्यक्ष महोदय हे योग्य निर्णय घेतील. आत्ता मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत होतो असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.