टायर फुटल्याने ट्रकची थेट झाडाला धडक
सुदैवाने जिवीतहानी टळली, कुऱ्हा - काकोडा मार्गावरील घटना
कुऱ्हा ता मुक्ताईनगर
मुक्ताईनगर कडून कुऱ्हा कडे जाणाऱ्या ट्रकचे अचानक टायर फुटल्याने ट्रक झाडावर आधळला
कुऱ्हा येथील एस आर पेट्रोल पंपा समोर घडली घटना
जळगांव खान्देश वरून जोंधनखेडा धरणावर सिमेंट भरून जाणाऱ्या ट्रकचे MH -१९-Z- ३९१३ दि. २४ रोजी संध्याकाळी ४:३० वाचेच्या सुमारास अचानक क्लिनर साईडने टायर फुटल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या एक बाभुळच्या झाडावर आधळले असून मात्र ट्रक चालक विजय पुरोहित वय ५० रा जळगांव, व क्लिनर ( वाहक ) साबीर पिंजारी ४० रा जळगाव सुरक्षित असून जीवित हानी टळली आहे
◆मोठा अनर्थ टळला◆
अचानक ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाभूळच्या झाडावर आधळल्याने ही घटना ५ वाजेच्या अगोदर अघडल्याने मोठा अनर्थ टळला आहे संध्याकाळी ५ वाजेला स्व.अशोक फडके विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कुल शाळा असल्याने शाळा सुटल्यावर जवळपास दोन्ही शाळेतील पाचशे ते सहाशे विध्यार्थी रस्त्याने जात असतात त्यामुळे मोठा अनर्थ टळला