गुरुदासपूर: पाकिस्तान सीमेजवळील गुरुदासपूरमधील बाटला या शहरात काल बुधवारी फटक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक जण जखमी आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. हृदय पिळवण टाकणारी ही घटना असल्याचे म्हणत मोदींनी ज्यांना या घटनेत जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.