नवी दिल्ली-राजस्थानमध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक जागा मिळवीत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये आता राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु आहे. अनुभवी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि युवा नेतृत्व सचिन पायलट यांच्यात स्पर्धा सुरु आहे. दरम्यान दोन्ही नेते दिल्लीत तळ ठोकून बसले आहे. राहुल गांधी याबाबत निर्णय घेणार आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या हातात हात घेत एक फोटो शेअर केले आहे. यात राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे ‘द युनाइटेड कलर ऑफ राजस्थान’ असल्याचे म्हटले आहे.
The united colours of Rajasthan! pic.twitter.com/D1mjKaaBsa
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 14, 2018
राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान सचिन पायलट देखील मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. कॉंग्रेसकडून दोघांची मनधरणी सुरु आहे. आज याबाबत फैसला होणार आहे.
काल राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांचे नाव निश्चित केले होते. त्यावेळी देखील राहुल गांधी यांनी कमलनाथ व ज्योतिरादित्य सिंधिया यांना कवेत घेत लिओ टोलस्टोय यांचे ओळी लिहिल्या आहे.