जवानांच्या वाहनावर दगडफेक केल्याने वाहन उलटले

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) एक गाडी उलटल्याने झालेल्या अपघातात १९ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना त्वरील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गस्तीवर जात असताना दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या महिन्यात राज्यभरात विविध ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार जवानांना घेऊन हे वाहन श्रीनगरकडे जात होते. वाहनावर अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. या वाहनातून प्रवास करत असलेले १९ जवान जखमी झाले.

गेल्या काही दिवसांपासून दगडफेकीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. महिन्या सुरूवातीलाच तामिळनाडूतून आलेल्या एका पर्यटकाचा दगडफेकीत मृत्यू झाला होता. त्यापूर्वी दंगेखोरांनी एका स्कूल बसवर दगडफेक केली होती. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. तत्पूर्वी मेहबुबा मुफ्ती सरकारने २००८ ते २०१७ दरम्यान दगडफेकीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या ९७३० लोकांवरील खटले मागे घेतले होते. यामध्ये अनेक जण पहिल्यांदाच गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाले होते.