तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता ७ वी च्या वर्गात शिकणारी कुमारी योगिनी सुनिल परदेशी ह्या विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे नेमसुशिल विद्यामंदिरातीलच मुख्याध्यापक तथा योगिनीचे वडिल यांचा प्रसंगावधाने वाचला जीव.
सदर याबाबतीत नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सुनिल घरी आले घरात लाईट गेलेली असता त्यांनी इन्व्हर्टरच्या स्वीचला तपासून बघितले अचानकपणे त्यांचा स्पर्श विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला झाला अन जोरदार विजेचा धक्का त्यांना बसला घरात सुदैवाने यावेळी घरात मुलगी योगिनी व त्यांची पत्नी तसेच आई होती परंतु विजप्रवाहातून त्यांना सोडवावे कसे हा प्रश्न पडला होता? त्यांना सोडवण्यासाठी आई व पत्नी यांनी अतोनात प्रयत्न केले परंतु हतबल व्हावे लागले शेवटी त्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात आई व पत्नी देखील त्यांच्या संपर्कात आल्या परंतु त्यांना स्पर्श करताच एकमेकांना विजेचा जबर धक्का बसत होता शेवटी योगिनी च्या अभ्यासू व कल्पकतेला सलाम म्हणावा लागेल लगेच तिने घरांत असलेल्या लाकडी स्टूल आणून विद्युतप्रवाह करणाऱ्या वायरीच्या दिशेने सरकवत सदर वायर बाजूला सारली. अवघ्या ७ वी च्या इयत्तेत शिकणाऱ्या योगिनीने आपल्या पित्याचे प्राण आपल्या अभ्यासू वृत्तीने वाचवले असंच म्हणावं लागेल वेळ जरी आली होती पण काळ योगिनीने रोखून धरला होता आपल्या ज्ञानाच्या जोरावर व प्रयत्नांनी पित्याला गतप्राण होण्यापासून रोखले सदरील घटना जेव्हा परिसरातील नागरिकांना व विद्यामंदिरातील शिक्षकांना कळाली तेव्हा लगेच सर्वांनी परदेशी यांच्या घराकडे धाव घेतली व परिस्थिती जाणून घेतली यावेळी परिसरातील नागरिक व नेमसुशिल विद्यामंदिरातील शिक्षकांनी योगिनीच्या प्रसंगावधानाचे भरभरून कौतुक करत तिचे अभिनंदन केले. व तिच्या धाडसी वृत्तीला सर्वांनी सलाम केला आज संपूर्ण शहरात तिच्या असामान्य कार्याबद्दल शहरात चर्चा व गौरव होत आहे.