महामार्गावरील फलकाची चोरी – तिन चोरटे गजाआड

महामार्गावरील दिशा दर्शक फलक बनले चोरट्यांचे कुरण - वाहन धारकांची होते दिशाभुल 

वरणगांव । प्रतिनिधी

चौपदरीकरण झालेल्या महामार्गावर वाहन धारकांसाठी ठिक – ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे दिशादर्शक फलक चोरट्यांचे कुरण झाले असुन दिशादर्शक फलक चोरी करतांना वरणगांव पोलीसांनी तिन चोरट्यांना रंगेहाथ पकडून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

वरणगांव शहर व परिसरात भुरट्या चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. यामध्ये दिपनगर प्रशासनाची राखेची व पाण्याची जलवाहिनी व भंगार साहीत्य तसेच विज निर्मीतीसाठी लागणारा कोळसा आणि शेती उपयोगी साहीत्याची चोरी असे प्रकार नित्याचेच झाले असुन याबाबत वरणगांव पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत . याची दखल घेत पोलीस व दिपनगरच्या सुरक्षा यंत्रणेने रात्रीची गस्त वाढवली आहे. यामुळे भुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा जुन्या व चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरील दिशादर्शक फलकांच्या चोरीकडे वळवला आहे. भुरटे चोरटे महामार्गावर लावण्यात आलेले दिशादर्शक फलक रात्रीच्या सुमारास चोरून नेत असल्याच्या तक्रारीमध्येही वाढ होवू लागल्याने सजग झालेल्या पोलीसांनी रात्रीच्या गस्तीवर असताना महामार्गावरील फुलगांव जवळील जोगेश्वरी हॉटेल नजिकचा दिशादर्शक फलक ट्रॅक्टरद्वारे चोरून नेत असताना तिन भुरट्या चोरांना वाहनासह ( ट्रॅक्टर ) रंगेहाथ पकडले तर एक चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला आहे .

*???????? या चोरट्यांवर झाली कारवाई*
महामार्गावरील दिशा दर्शक फलक चोरट्यांचे कुरण झाले आहे. अशाच प्रकारे फलकाची चोरी करून ट्रॅक्टर क्रं. एम.एच.१९ / डि. वाय.४०६८ ने नेत असताना मुकेश अरुण सोनवणे, तुषार राजेंद्र सोनवणे, गौरव दिलीप देवगिरे यांना ताब्यात घेऊन अटक केली तर सैय्यद रोशन सैय्यद ताहेर हा फरार होण्यात यशस्वी झाला असुन त्याचा शोध सुरु आहे. याबाबत रईस शेख महामार्ग सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*????????वाहन चालकांची होतेय दिशाभूल*
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने महामार्ग प्रशासनाने ठिक – ठिकाणी दिशादर्शक फलक लावल्याने वाहन धारकांना दिलासा मिळत आहे. मात्र, भुरटे भंगार चोरटे काही ठिकाणचे दिशादर्शक फलक चोरून नेत असल्याने लांबच्या अंतरावरील नविन वाहन चालकांची चालकांची चांगलीच तारांबळ उडत असून दिशादर्शक फलका अभावी त्यांची दिशाभुल होत आहे.