अखेर मेहबूबा मुफ्तीला भेटण्यासाठी त्यांच्या मुलीला परवानगी !

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांची मुलगी इल्तिजा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते, त्याचा व्हिडीओ देखील इल्तिजाने शेअर केले होते. त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयात गेली होती. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने इल्तिजाला आपल्या आईची म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेण्याचे आदेश दिले आहे. कलम ३७० रद्द झाल्यापासून इल्तिजाची आपल्या आईबरोबर भेट होऊ शकलेली नाही.

मुफ्ती कुटुंबातील अन्य सदस्यांनी दोन वेळा पीडिपी प्रमुखांची भेट घेतली आहे. इल्तिजा सुद्धा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांकडे जाऊन आईला भेटण्याची परवानगी मागू शकते असे अॅटॉर्नी जनरल यांनी गुरुवारी सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायलयात सांगितले. मेहबूबा मुफ्ती यांची आई आणि बहिणीने आतापर्यंत दोनवेळा त्यांची भेट घेतली आहे असे के.के.वेणूगोपाळ यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

या याचिकेमागे आणखी काही वेगळा हेतू असू शकतो असे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. मला २२ ऑगस्टपर्यंत घरातून बाहेर पडू दिले नाही त्यामुळे राज्याबाहेर गेले असे इल्तिजाच्या वतीने तिचे वकिल नित्या रामकृष्णन यांनी कोर्टाला सांगितले.