निवडणुकीत मोठा गेम झाला आहे: शत्रुघ्न सिन्हा

0

बिहार: २०१९ च्या लोकसभेच्या निकालात अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना कराव लागला आहे. त्यात कॉंग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांचापण पराभव झाला आहे. ते बिहार मधून पाटणासाहिब मतदार संघातून उभे होते. त्यांचा पराभव भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. पराभवानंतर पत्रकारांसोबत बोलताना, या निवडणुकीत मोठा गेम खेळला गेला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

बंगाल, आंध्र प्रदेश मधील निकाल पाहता त्या ठिकाणी मोठा गेम झाला आहे. यावेळी हे बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपला पराभव स्वीकारत सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे अभिनंदन केले आहे. ते दोघे उत्तम रणनीतीकार आहे असे ते म्हणाले आहे.

रविशंकर प्रसाद यांचे अभिनंदन करत ते माझे जुने मित्र असून त्यांना शुभेच्छा देतो व येणाऱ्या काळात पाटणा आता स्मार्ट सिटी बनेल अशी आशा व्यक्त करतो अस म्हणत त्यांना मत देणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त केले आहे. पाटणा साहिब मधून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे कॉंग्रेस कडून तर भाजपाकडून रविशंकर प्रसाद हे उभे होते. याठिकाणी झालेल्या मतदानात रविशंकर यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी विजय झाला आहे.