दौन महीन्यांपासुन पिण्याच्या पाण्याची टंचाई असुन भर ऊन्हाळ्यात आमच्या त्या वार्डातील लोकांची पाण्याविना फरफट होत आहे”.
तीन/चार दीवसापुर्वी तालुक्यातील बोदवड(कुर्हा) येथुन शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे कोळी यांना बोदवड गावातील शिवसेना कार्यकर्ते नरेश पाटील,विष्णु पाटील,गणेश सोनवणे, विष्णु ईंगळे यांचेकडुन माहीती मिळाली की, “आमच्या गावातील वार्ड क्र २ मधे ५०/६० कुटुंब असुन त्या ठीकाणी दौन महीन्यांपासुन पिण्याच्या पाण्याची टंचाई असुन भर ऊन्हाळ्यात आमच्या त्या वार्डातील लोकांची पाण्याविना फरफट होत आहे”.
महेंद्र मोंढाळे कोळी यांनी संबंधीत ग्रामसेवकाला फैलावर घेतले व त्वरीत तीन दीवसाच्या आत बोदवड गावच्या वार्ड क्र.२ मध्ये पिण्याचे पाणी पोचवण्यासाठी कार्यवाही करण्याची सुचना दीली.गावाच्या प्राथमिक गरजा भागवण्याचे कर्तव्य हे ग्रामसेवक व सरपंच यांचे असतांना जर गावातील बहुसंख्य नागरीकांना अगदी प्राथमिक गरजा सुद्धा पुर्ण होवु शकणार नसतील तर त्यांची पद काय फक्त मिरवण्यासाठी आहेत काय? असा सवाल करत आमदार चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पेयजलाची सोय करण्याचे तात्काळ सुचना केल्या व वेळोवेळी युवासेनेचे सचिन भोई व निलेश मेढे यांनी त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.
त्याप्रमाणे ग्रामसेवक ऊमेश चौधरी यांनी लागलीच आवश्यक साहीत्य खरेदी करत दुसर्याच दीवशी जेसीबी मशीन पाचारण करुन खोदकामास वेग दीला.गावातील शिवसेना पदाधिकारी नरेश पाटील,विष्णु पाटील,गणेश सोनवणे,विष्णु ईंगळे,सोपान इंगळे,संजय कहाते,वैभव पाटील, ऋषिकेश पाटील , तलवारे यांचे मदतीने काल रात्रीच सदर पाईपलाईन मेन व्हाल्वशी जोडणी करुन वार्ड क्र.२ मधील पाणीपुरवठा सुरळीत केला.
त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानत आहेत व तीस वर्षात झाले नाही ती कामे आता या तीन वर्षात होत आहेत म्हणुन गावकरी अतीशय आनंदी असल्याचे चित्र दीसत आहे.