‘राजी’ या चित्रपटाला एकीही कट नाही

0

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘राजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढतच चालली आहे. या चित्रपटातील गाणे ही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. आता आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘राजी’ चित्रपटातील एकाही सीनला कट न देता ब्रिटीश सेन्सॉर बोर्डाने ‘१२ अ’ प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे ‘जंगली पिक्चर्स’ आणि ‘धर्मा प्रॉडक्शन’ भलतेच खूश झाले आहेत.

या चित्रपटाला १३८ मिनीटे म्हणजेच (२ तास १८ मिनीटे) मंजुरी देण्यात आली आहे. आता चित्रपटात चाहत्यांना आलियाची देशभक्ती पाहायला मिळणार आहे. ‘राजी’ चित्रपटात आलियासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. एका भारतीय महिलेची कथा या चित्रपटात मांडली आहे, जी पाकिस्तानी आर्मी ऑफिसरसोबत लग्न करुन देशासाठी गुप्तहेराचे काम करत असते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित आहे. ११ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.