“माणसाइतके पवित्र दुसरे काही नाही ” – उद्धव कानडे…

पिंपरी |माणसाइतके पवित्र दुसरे काही नाही, अशी कविवर्य नारायण सुर्वे यांची श्रद्धा होती. ‘साहित्य अकादमीचे मानकरी’ या ग्रंथात साहित्यिकांमधील माणूसपण अधोरेखित करण्यात आले आहे” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह उद्घव कानडे यांनी नेरळ येथे गुरुवारी काढले.

कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त कानडे यांच्या हस्ते प्रदीप गांधलीकर यांना कुसुमाग्रज पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंच अध्यक्ष सुरेश कंक, कामगार साहित्यिक अरुण गराडे, नारायण सुर्वे यांचे जावई गणेश घारे, कन्या कल्पना घारे यांची उपस्थिती होती.

गणेश घारे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना घारे यांनी आभार मानले.