राज्यात ६५ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड; काँग्रेसकडून तक्रार !

0

मुंबई: आज राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. मतदान सुरु झाल्यानंतर काही तासातच मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार घडले. राज्यात ६५ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान याबाबत कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघात ८ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाले. लागलीच यंत्र बदलविण्यात आले.