वनगांच्या मुलाच्या भेटायला बोलवले होते-मुख्यमंत्री

0

मुंबई : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाने मला भेटण्यासाठी मेसेज केला, पाचव्या मिनिटाला मी त्याला रिप्लाय करुन भेटायला येण्याचे सांगितले. वनगा कुटुंबियांनी भाजपवर केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. वनगा कुटुंबियांचा गैरसमज झाला आहे. चिंतामण वनगा हे भाजपचे वरिष्ठ नेते होते, त्यांच्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल सहानभूती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निवडणुकीच्या दरम्यान वनगा कुटुंबियांना तिकीट द्यायचा आमचा निर्णय होता.

मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितले होते , की आम्ही वनगा कुटुंबियांना तिकीट देणार आहोत त्यामुळे मदत करा असेही सांगितले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते वनगा कुटुंबातील व्यक्ती असेल तर निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर 1 तारखेला सुभाष देसाई यांच्यासोबतही देखील चर्चा झाली. मात्र ३ में रोजी वेगळेच चित्र प्रसार माध्यमातून पाहायला मिळाले असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वनगा यांनी भाजप पक्ष मोठा केला. वनगा यांच्या निधनांनंतर जागा रिक्त झाली, भाजपचे नुकसान होईल असे वनगा कुटुंबीय वागणार नाही असे मला वाटतते असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.