एकाच रुळावर मेमू आणि मालगाडी समोरासमोर आल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना रायपूर बिलासपूर दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

 

एकाच रुळावरुन धावली मेमू आणि मालगाडी

 

रायपूर दि 12

बालासोर येथे घडलेल्या रेल्वेच्या अपघातात तब्बल 288 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच प्रकारचा अपघात टळल्याचे पुढे आले आहे. एकाच रुळावरुन मेमू आणि मालगाडी धावल्याची घटना रायपूर, बिलासपूर ते कोरबा जाणारी मेमू रुळावर थांबल्यानंतर त्याच रुळावर 100 मिटर अंतरावर मालगाडी थांबलेली दिसल्याने प्रवाशांच्या पायाखालची वाळूच सरकली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे या प्रवाशांचे जीव वाचल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एकाच ट्रॅकवर दोन्ही रेल्वे समोरासमोर आल्याने खळबळ : रायपूर ते कोरबा जाणारी मेमू ट्रेन मधल्या रुळावर थांबवण्यात आली होती. तर पॅसेंजर ट्रेन थांबवल्यानंतर त्याच ट्रॅकवर 100 किमी अंतरावर एक मालगाडी उभी असल्याचे दिसले. एकाच ट्रॅकवर दोन्ही रेल्वे समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले, अशी चर्चा प्रवाशामध्ये सुरू होती. प्रवासी स्वतःला भाग्यवान समजत होते. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी आपले स्पष्टीकरण दिले आहे.