पाकिस्तानात दहशतवादी संघटना होत्या: इमरान खान

0

वॉशिंग्टन: पाकिस्तान मध्ये दहशतवादी संघटना होत्या अशी कबुली, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले आहे. मागच्या काही पाकीस्तानानातील सरकारने अमेरिकेला सत्य काय आहे हे सांगितले नाही अशी कबुली त्यांनी दिली आहे. पाकिस्तानमध्ये ४० दहशतवादी संघटना कार्यरत होत्या, असे त्यांनी अमेरिकेतील काँग्रेसनल पाकिस्तान कॉकसच्या अध्यक्षा शीला जॅक्सन यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

आम्ही दहशतवादाविरोधात लढाई लढत असल्याचे अधोरेखित करतानाच, पाकिस्तानचा अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्याशी कोणताही संबंध नाही, असेही खान यांनी स्पष्ट केले आहे. खान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कम झाल्याचे बोलले जात आहे. अलकायदा ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात कार्यरत आहे. पाकिस्तानात कुठेही तालिबानी दहशतवाद नव्हता, मात्र आम्ही अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धात भाग घेतला. दुर्दैवाने गोष्टी चुकीच्या दिशेने वळत असताना आम्ही मात्र अमेरिकेला वस्तुस्थितीची माहिती देऊ शकलो नाही. यासाठी मी आमच्या सरकारलाच जबाबदार धरतो, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य इम्रान खान यांनी केले आहे.

शांततेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आम्ही तालिबानला तयार करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही खान म्हणाले. आता अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध वेगळ्या स्तरावर पोहोचले असल्याचेही ते म्हणाले. दोन्ही देशांना संशयाच्या नजरेने पाहणे दु:खद आहे, मात्र इथून पुढे आमचे संबंध एका वेगळ्या स्तरावरचे असतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.