नवी दिल्ली ः देशात पेट्राल-डीझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने जास्त मायलेज देणार्या गाड्यांना पसंती दिली जात आहे. यासाठी जनशक्तीच्या वाचकांसाठी आम्ही 10 लाख रुपयांच्या आत किंमत असलेल्या व सर्वात जास्त मायलेज देणार्या ‘टॉप 10’ कार्सची माहिती घेवून आलो आहोत.
मारुती सुझुकी डिझायर
सर्वात जास्त फ्यूल एफिशिएंट पेट्रोल कारमध्ये मारुती सुझुकीची डिझायर या यादीत टॉपवर आहे. याच्या एएमटी व्हेरियंटमध्ये 24.2 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज आणि मॅन्यूअल व्हेरियंट मध्ये 23.26 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. सिडानची किंमत 5.94 ते 8.90 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी आणि टोयोटा ग्लांजा
मारुती सुझुकी बलोनो आणि टोयोटा ग्लांजा लिस्टमध्ये दुसर्या स्थानावर आहे. दोन्ही हॅचबॅकमध्ये 23.87 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. बलेनोची सध्याची किंमत 5.90 9.10 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट
फेसलिफ्ट करण्यात आलेल्या स्विफ्ट मध्ये आयडल स्टार्ट-स्टॉप फंक्शन सोबत एक नवीन 1.2 लीटरचे ड्यूअलजेट इंजिन मिळाले आहे. हॅचबॅकच्या एएमटी व्हर्जनमध्ये 23.76 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज तर मॅन्यूअल व्हेरियंट मध्ये 23.20 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. याची किंमत 5.73 ते 8.41 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी ऑल्टो
मारुती सुझुकी ऑल्टो भारतीय बाजारात सर्वात जास्त विकणार्या कारपैकी एक आहे. या कारची किंमत 2.99 ते 4.48 लाख रुपये आहे. एन्ट्री लेवल हॅचबॅकमध्ये 22.5 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते.
रेनो क्विड
मारुती ऑल्टोची स्पर्धक रेनो क्विडजची किंमत 3.12 ते 5.31 लाख रुपये आहे. 0.8 लीटर आणि 1.0 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन सोबत उपलब्ध आहे. 0.8 लीटर इंजिनमध्ये 20.71 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते तर 1.0 लीटर इंजिन मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत 22 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज आणि मॅन्यूअल ट्रान्समिशन सोबत 21.74 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते.
मारुती सुझुकी वेगनाआर
मारुती सुझुकीची टॉपबॉय हॅचबॅक वेगनआरची किंमत 4.65 ते 6.18 लाख रुपये आहे. ही दोन पेट्रोल इंजिन 1.0 लीटर 3 सिलिंडर आणि 1.2 लीटर 4 सिलिंडर मध्ये उपलब्ध आहे. 1.0 लीटर इंजिन 21.79 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज तर 1.2 लीटर इंजिन मध्ये 20.52 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते.
मारुती सुझुकी एस प्रेसो
एस प्रेसो 1.0 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन सोबत उपलब्ध आहे. एजीएस ट्रान्समिशन सोबत यात 21.7 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज आणि 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स सोबत 21.4 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. एस प्रेसोची किंमत 3.70 ते 5.18 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो
सेलेरियो कंपी पॉप्यूलर हॅचबॅक पैकी एक आहे. सेलेलियोची किंमत 4.53 लाख ते 5.78 लाख रुपये आहे. हॅचबॅक मॅन्यूएल आणि एएमटी दोन्ही व्हेरियंटमध्ये 21.63 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते.
मारुती सुझुकी इग्निस
मारुती सुझुकी इग्निस मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. कंपनीचा दावा आहे की , यात 2.89 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. कारला चार व्हेरियंटमध्ये सिग्मा, डेल्टा, जेटा आणि अल्फा मध्ये उपलब्ध केले आहे. याची किंमत 4.89 ते 7.30 लाख रुपये आहे.
ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस
ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस 1.2 लीटर इंजिन मॅन्यूअल आणि गियरबॉक्स ट्रान्समिशन सोबत येते. हॅचबॅक मॅन्यूअल ट्रान्समिशन सोबत 20.7 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत 20.5 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. याची किंमत 5.19 ते 8.40 लाख रुपये आहे.