बंगळूर-नरेंद्र मोदी जेव्हा घाबरतात तेव्हा ते वैयक्तिक आक्रमण करतात. माझ्याबद्दल जे काही सांगते ते मला प्रभावित होणार नाही. माझ्यावर ते वैयक्तिक हल्ले करतात मात्र मी त्यांच्यावर आरोप न करता त्यांनी दिलेले आश्वासनाचे काय झाले याबाबत प्रश्न विचारू शकतो असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. कर्नाटक निवणुकीच्या औरड प्रचार सभेत ते बोलत होते.
“पाच वर्षांपूर्वी आपण जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत. मोदींनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना 2.5 हजार कोटी रुपये माफ केले आहेत. आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे असे आरोपही त्यांनी यावेळी केले.