फेसबुकवरून सह जिवनाची गाठ बांधली मात्र, दोनच वर्षात जिवन यात्रा संपवली
मुक्ताईनगर । प्रतिनिधी
सोशल मिडीयाच्या फेसबुक वरून मैत्री झाली. मैत्रीचे रुपातंर सात जन्माच्या सहजिवन रेशीम गाठीत बांधल्या गेले मात्र, कविताने आपल्या गळ्याला दोराची गाठ बांधून दोन वर्षातच आपली जिवन यात्रा संपवली. या घटनेने गावात शोक व्यक्त केला जात आहे.
( जाहीरात घ्यावी )
मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील प्रमोद भटकर हा गिट्टीखदानीच्या मशिनवर ऑपरेटरचे काम करतो. अशा या प्रमोदचे सोशल मिडीयाच्या फेसबुकवरून छत्तीसगड राज्यातील कविता ( वय – २० ) या युवतीशी मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपातंर सात जन्मोजन्मीच्या सहजिवनातील विवाहाच्या रेशीम गाठीत झाले. मात्र, दोनच वर्षाच्या कालावधीत कविताच्या मनात संचारलेल्या विचाराने तिने चक्क घरात कुणीही नसतांना छताला दोरी बांधून गळफास लावून आपली सहजिवनाची जिवन यात्राच संपवली. हि घटना सांयकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कविताचे सासरे सुकदेव भटकर शेळ्या चारून घरी आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता उघडकीस आली. याबाबत प्रमोद भटकर याच्या जबाबावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संदीप दुनगहू या घटनेचा तपास करीत आहेत .