बंगळूर- गेल्या अनेक वर्षापासून कर्नाटकात कॉंग्रेसची सत्ता आहे. मात्र या राज्यात अद्यापही हवा तितका विकास झालेला नाही. कर्नाटकातील जनता कॉंग्रेसला कंटाळलेली असून या निवडणुकीत ते कॉंग्रेसला घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही. यंदा कर्नाटकात बदल हा निश्चित आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. कॉंग्रेसने जातीपाचे राजकारण करून जनभावना भडकविण्याचे काम केले असल्याचे आरोपही त्यांनी केले आहे.