परिसरात भीतीचे वातावरण.
शहादा l म्हसावद येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरांनी चार घरांवर डल्ला मारत लाखोचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.ही घटना सकाळी उघडकीस आल्याने याविषयीची चर्चा गावात रंगू लागल्याने म्हसावद गावासह परिसरात खळबळ उडाली. व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीची गस्त पोलीस करतात की नाही? किंवा पोलीस गस्त घालत असतील तर चोरी झाली कशी अशी चर्चा गावात होत आहे.यामुळे चारही घरे बंद अवस्थेत असलेली घरे चोरांनी सहज फोडली.त्यां घरांचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सोने चांदीचे दागिनेसह रोकड रक्कम चोरून नेल्याचा अंडाज व्यक्त होत आहे तरी घटनेचा पंचनामा झाल्या नंतरच चोरी करण्यात आलेला मुद्देमाल समजणार आहे.यात धनराज निंबादास जयस्वाल,संदीप रूबाबसिग चव्हाण,
देवानंद झावरू धनगर,
मल्हारराव बापू ठाकरे सर अशी चारही जणाची घरे फोडल्याची घटना काल रात्री घडली आहे.पोलिस रात्रीची गस्त घालतात मग चोरी झाली कशी असा प्रश्न सर्व सामान्य जनतेत उपस्थित होऊ लागला आहे.