नवी दिल्ली-मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यावर माजी अर्थमंत्री, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. ‘इलेक्शन बजेट’ असे वर्णन त्यांनी केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सादर केलेला हंगामी अर्थसंकल्प निवडणुकांशी संबंधित असून मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर या अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येईल असे मनमोहन सिंग यांनी सांगितले आहे.
शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना इन्कम टॅक्स गिफ्ट देण्यात आले आहे. त्याबद्दल बोलतांना मनमोहन सिंह यांनी शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना देण्यात आलेल्या सवलतीचा निवडणुकीशी संबंध आहे असे सांगितले.
मनमोहन सिंग नरसिंह राव सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यांनी १९९१ साली त्यांनी आर्थिक सुधारणा जाहीर केल्या होत्या. हंगामी अर्थसंकल्पात सरकारने होणाऱ्या खर्चावर काम केलेले नाही असे त्यांनी सांगितले.