अखेर यादिवशी प्रदर्शित होणार ‘पीएम नरेंद्र मोदी’ !

0

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शित होऊ शकलेला नाही. विरोधकांनी आक्षेप घेतल्याने चित्रपटाला प्रदर्शन रोखावे लागले. अखेर आता हा चित्रपट २३ में रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु निवडणुकीमुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका देखील करण्यात आली होतील. या चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉयची मुख्य भूमिका आहे.