प्रदीप चव्हाण- स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्टला संपूर्ण वातावरण देशभक्तीमय असते. एकंदरीत वातावरण पाहता अंगात एक देशभक्तीमय ऊर्जा संचारलेली असते. शाळा, महाविद्यालय येथे तर देशभक्तीमय कार्यक्रम घेतले जातात. त्याच दृष्टीने टीव्ही, चॅनेलवर देखील देशभक्तीमय चित्रपट तसेच गीतांची रेलचेल असते. हाच धागा पकडून नवीन देशभक्तीमय ऐतिहासिक पार्श्ववभूमी असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला या स्वातंत्र्यदिनी येत आहे. या १५ ऑगस्टला तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिन्ही चित्रपट ऐहितासिक आणि देशभक्तीला अनुसरून असल्याने प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटांची वाट पाहत आहे.
या तिन्ही चित्रपटात दिग्गज बॉलिवूड अभिनेते तसेच अभिनेत्री मुख्य भूमिकेत असल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. एक म्हणजे बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा ‘गोल्ड’, दुसरा जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यमेव जयते’ आणि तिसरा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखेवर अवलंबून असलेला अभिनेत्री कंगणा रानौत यांचा ‘मणिकर्णिका’ हा आहे. हे तिन्ही चित्रपट यंदाचे स्वातंत्र्यदिन अधिक रंगतदार बनविणार आहे. दिग्गज कलाकारांची मुख्य भूमिका असल्याने हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार हे मात्र नक्की. असे असले तरी तिघांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या ‘काटे की टक्कर’ असणार हे देखील तेवढेच सत्य आहे.
‘गोल्ड’-
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट हिंदुस्थानी हॉकीपटू तपन दास यांच्या जीवनावर आधारित आहे. तपन दास यांनी हिंदुस्थानला १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक येथे हॉकी या खेळासाठी पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. अक्षय कुमार या चित्रपटात तपन दास यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. एकंदरीत हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या कालखंडातील असल्याने पाहावयास मिळते.
या चित्रपटात अक्षयकुमार हॉकी खेळाडू तपन दासची भूमिका साकारत असून त्याचे स्वप्न साकार करून ते देशासमोर आदर्श निर्माण करतात. स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याचे त्याचे स्वप्न या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. लंडनमध्ये १९४८ च्या ऑलिम्पिकसाठी तपनने टीमला प्रशिक्षण दिले. इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या मैदानात दोन हात करण्यासाठी सर्व खेळाडूंना त्याने प्रेरणा दिली. ज्यामुळे भारताने १२ ऑगस्ट, १९४८ रोजी सुवर्णपदक जिंकले आणि देशासाठी ही एक गर्वाची गोष्ट होती. देशासाठी केलेल्या कामावर हा चित्रपट असल्याने आणि स्वतंत्रदिनी प्रदर्शित होत असल्याने याकडे अधिक लक्ष लागले आहे.
‘सत्यमेव जयते’-
बॉलिवूडमध्ये आपल्या पिळदार शरीरासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यमेव जयते’ हा नवा सिनेमा येत आहे. मिलाप मिलान झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट देखील स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहे. “या स्वातंत्र्यदिनी, न्याय मिळणार,” असे म्हणत चित्रपटाचे पहिले पोस्टर जॉनने ट्विटवर शेअर केले होते.
‘बेईमान पीटेगा,करप्शन मिटेगा’ अशी टॅगलाइन असणाऱ्या ‘सत्यमेव जयते’तून समाजातील ज्वलंत प्रश्नांना हात घालण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. याचवर्षी जॉन अब्राहमने पोखरण अणुचाचणीच्या घटनेवर आधारित ‘परमाणू’ हा चित्रपट करून ऐतिहासिक घटना जगासमोर मंडळी. आता पुन्हा ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून देशासमोर भ्रष्ट्राचारासारखा महत्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकलेला आहे.
झाशीची राणी ‘मणिकर्णिका’-
इतिहासाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासाठी एक पान राखून ठेवले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची कामगिरी ही अजरामर आहे. हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी क्वीन गर्ल कंगणा रानौत ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट करीत आहे. या चित्रपटात त्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जिवंत देखावा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. हा चित्रपट देखील १५ ऑगस्टला रिलीज होतो आहे. स्वातंत्र्य दिन आणि राणी लक्ष्मीबाई यांची ऐतिहासिक कामगिरी यांचा हा मिलाप प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे.