VIDEO…केरळच्या एका मंत्र्याने केली स्वतःच्या खांद्यावरून मदत सामुग्रीची वाहतूक !

0

तिरुअनंतपुरम-केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रलयकारी महापुरात केरळचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता परिस्थिती काहीशी ओसरली आहे. जनजीवन पूर्ववत करण्यासाठी केरळला देशभरातून आणि जगभरातून मदत मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क केरळचे शिक्षणमंत्री स्वतःच्या खांद्यावरून सामुग्रीची वाहतूक करीत आहे.

सी.रवींद्रनाथ असे केरळच्या शिक्षण मंत्र्यांचे नाव आहे. केरळला जगभरातून मदत सामुग्री मिळत आहे. या सामुग्रीची वाहतूक एका सुरक्षित ठिकाणी केली जात आहे.