सावखेडासीमच्या तक्रारदाराचे यावलला उपोषण

0
यावल- सावखेडासीम येथील सुनील नथ्थू भालेराव यांनी पाच मागण्यांसाठी बुधवारपासून यावल तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. दहा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. घरकुलाचा लाभ घेतलेल्या जागेच्या उतार्‍यावर शासनाचे नाव लावल्याने त्यांच्या पत्नीस ग्रामपंचायत सदस्य पदावरून कमी करणार्‍यांवर कारवाई करावी, गरजूंना वैयक्तिक शौचालयाचा लाभ द्यावा, इंदिरा आवास लाभार्थीचे नाव रद्द करणार्‍यांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी उपोषण छेडले आहे.
उपोषणस्थळी गटविकास अधिकारी वाय.पी.सपकाळे, सहा.गटविकास अधिकारी के.सी.सपकाळे, शेख समद शेख, जरुद्दीन फारुकी यांनी सुनील भालेराव यांची भेट घेऊन उपोषण सोडणे विषयी विनंती करीत तंच्या तक्रार व मागणीविषयी वरीष्ठ कार्यालयास कळविण्याबाबत चर्चा केली मात्र उपोषणार्थी उपोषणावर कायम होते.