यंदा मान्सूनला विलंब; केरळमध्ये ६ जूनला धडकणार !

0

नवी दिल्ली: यंदा मान्सून केरळमध्ये ६ जूनला धडकणार आहे. सर्वसाधारण वेळेपेक्षा यंदा मान्सून ५ दिवस उशिराने केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तविला आहे. या वर्षी कमी पावसामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे, यंदा देखील पावसाळा कमी असण्याची शक्यता असल्याने ही धोक्याची घंटा आहे.