म्हणून चित्रपट निर्मात्यांना खुणावते काश्मिरचे सौंदर्य

0

पुणे-चित्रपटाच्या चित्रीकरणाला जम्मू काश्मिरला अधिक महत्व दिले जाते. जम्मू काश्मीरची सोंदर्यता सर्वांना खुणावते. त्यामुळे बॉलीवूड याला अपवाद नाही. १९६० च्या दशकात जेव्हा काश्मिरमध्ये दहशतवाद न होता तेव्हा विशेषत: चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चित्रपट निर्माते जम्मू काश्मिरला अधिक महत्व देत होते. मात्र त्यांनतर दहशतवादी कारवाया वाढू लागल्याने चित्रपट निर्मात्यांनी या ठिकाणी जाणे नाकारले. मात्र आता पुन्हा बॉलीवूड निर्मात्यांकडून चित्रीकरणासाठी पसंती देत आहे. अलिकडच्या काळात काश्मीरमधील नैसर्गिक संपत्तीचा नैसर्गिक सौंदर्यावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत माहिती देत आहोत.

राझी २०१८

काश्मीरमध्ये चित्रीकरण झालेल्या चित्रपटाच्या यादीत अलीया भट्टचा नवीन चित्रपट राझी यांचा नव्याने समावेश झाला आहे. १९९७ मध्ये सेट केलेला आणि हरिंदर सिक्का यांच्या कालिंग सेहमतवर आधारित कथेवर हा चित्रपट आहे. अलिया एक काश्मिरी महिलेच्या भूमिकेत आहे, पाकिस्थानी लष्करी कारवायाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ती एका पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी विवाह करते. या चित्रपटाचे चीत्रीकरण श्रीनगर, शिवपूर, बुद्धगम जिल्ह्यातील दुधपथी येथे तसेच पहलगाम येथे झालेले आहे.

अय्यारी २०१८

२०१८ मधील अय्यारी हा नीरज पांडे दिग्दर्शित सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी ​​यांच्या काश्मीर मधील दोन सेना अधिकार्यांची कथा असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची शुटींग गुलमर्ग आणि पहलगाम येथे झाली आहे.

फितूर २०१४

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला फितूर हा काश्मीरमधील एका प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहे. नोव्हेंबर २०१४  मध्ये श्रीनगर येथे या चित्रपटाची चित्रीकरण झाले आहे.

बजरंगी भाईजान २०१५

बजरंगी भाईजान २०१५ या चित्रपटाची शुटींग देखील या ठिकाणी झाली आहे. जवळपास ७ हजार लोक या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एकत्र आले होते. २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

हायवे २०१४

इम्तियाज अली यांचा आलिया भट्ट मुख्य भुमिकेत असलेल्या हायवे या चित्रपटाचे देखील चित्रीकरण काश्मीर मध्ये झालेले आहे. २०१४ मध्ये हा चित्रपट आला होता.

हैदर २०१४

विशाल भारद्वाज यांचा हॅमलेट या नाटकावर आधारित असलेला हैदर हा चित्रपट आहे. २०१४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात काश्मीरमधील एक कथा आहे. अनंतनागमधील केहबळ क्षेत्रातील माथान, जुन्या श्रीनगर, निशात बाग, दाल लेक, काझीगुंड, मार्तंड सूर्य मंदिर, नसीम बाग (काश्मीर युनिव्हर्सिटी गार्डन), हजरतबळ आणि सोनमर्ग येथे पहलगाम, केहिबळ परिसरात फिल्मी चित्रफीत, हॅडर चित्रित करण्यात आले. या चित्रपटात शहीद कपूर व श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिकेत आहे.

ये जनीवा है दिवाणी  २०१३

दीपिका पदुकोन व रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिकेत असलेला ये जनीवा है दिवाणी हा चित्रपट २०१३ मध्ये आला होता. मानली येथे या चित्रपटाचे शुटींग करण्यात आले.

जब तक है जान २०१२

यश चोप्रा दिग्दर्शित जब तक है जान हा चित्रपट आहे. हा यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट आहे.शाहरुख खान व अनुष्का शर्मा हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘जिया रे’ या गाण्याची शुटींग काश्मीर मध्ये करण्यात आली आहे. श्रीनगर, पहलगाम आणि गुलमर्ग आदी ठिकाणी चित्रीकरण झाले आहे. २०१२ मध्ये हा चित्रपट आला होता.

 

3 इडियट्स २००९

3 इडियट्स  हा एक चित्रपट असा आहे जो तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला भाग पडतो. सुपर-हिट कॉमेडी चित्रपटाचे चे बहुतेक दृश्ये बंगलोर व हिमाचल प्रदेशमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. काही भाग काश्मीरमधील पॅनगॉंग लेक, लडाख येथे चित्रित केले आहे. २००९ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.