या कारणाने धोनीला २०-२० संघात स्थान नाही; कोहलीने दिले स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघादरम्यान होणाऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले. त्यामुळे धोनीचे चाहते चांगलेच वैतागले होते आणि निवड समितीवर टीका देखील होत आहे. याच विषयावरून विराट कोहलीला देखील लक्ष केले जात होते. याबाबत कोहलीने काही भाष्य केलेले नव्हते पण अखेर याप्रकरणी कोहलीने आपेल मौन सोडले आहे.

धोनीला वगळल्याबद्दल कोहली म्हणाला स्वत: धोनीचे नवीन युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे मत आहे. त्यामुळे धोनीला ट्वेन्टी-२० संघातून वगळण्यात आले असले तरी तो वनडे संघात कायम आहे. त्याच्या संघात असण्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असे कोहलीने सांगितले आहे.

गेल्या वर्षभरात धोनीला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नाही. हे कारण पुढे करत निवड समितीने धोनीला डावलण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर एकदिवसीय संघातही रिषभ पंतला स्थान देऊन त्यांनी धोनीसाठी स्पर्धा निर्माण केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२०नंतर वनडे संघातून धोनीला डच्चू मिळणार का, अशी चर्चा सुरु आहे.