यावर्षातील पहिली जीएसटी बैठक संपन्न; रियल ईस्टेटवरील जीएसटी दरात कपात नाही !

0

नवी दिल्ली-जीएसटी काऊंन्सीलची २०१९ मधील पहिली बैठक आज पार पडली. यात व्यापार विषय बाबींवर चर्चा झाली. यात सर्वांत महत्त्वाचा निर्णय ‘कंपोजिशन स्कीम’बाबत घेण्यात आला. दीड कोटी पर्यंत उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना आता वर्षातून फक्त एकदाच रिटर्न फाईल भरावा  लागणार आहे. सोबतच सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ५० लाखापर्यंत व्यापार करणाऱ्या उद्योजकांना देखील ‘कंपोजिशन स्कीम’मध्ये आणण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे ४० लाख वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना जीएसटीमधून सूट जाहीर करण्यात आली आहे. याआधी ही सूट 20 लाख उलाढाल असलेल्या कंपन्यांना होती.

काही दिवसापूर्वी दीड कोटी पर्यंत उलाढाल असलेल्या उद्योगांना अकाऊंट आणि बिलिंग सॉफ्टवेयर मोफत देण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीत रियल ईस्टेट आणि लॉटरीवरील जीएसटीबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र त्यावर काहीही चर्चा झाली नाही. बांधकाम सुरु असलेल्या फ्लॅट आणि घरांवर ५ टक्के जीएसटी कमी करून तो ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता होती. मागील बैठकीत २६ वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.

केरळ राज्याला भीषण महापुरामुळे २ वर्षापर्यंत सेसला सूट देण्यात आली आहे.