नवी दिल्ली-नामांकित संगीत स्पर्धा ‘सारेगामापा’चा किताब इशिता विश्वकर्मा याने पटकाविला आहे. इशिता मध्य प्रदेशमधील जबलपुर येथील रहिवासी आहे. १६ वर्षीय इशिताने शेवटच्या फेरीत साहिल सोलंकी, तन्मय चतुर्वेदी, ऐश्वर्या पंडित, सोनू गिल आणि असलम अब्दुल माजिद या स्पर्धकांचा पराभव केला. ट्रॉफीसोबत इशिताला ५ लाख रुपये रोख व एक हुंडई कार बक्षिस स्वरुपात मिळणार आहे.
लखनऊचे तन्मय फर्स्ट रनर अप आणि पंजाबमधील अमृतसर येथील सोनू द्वितीय रनर अप घोषित करण्यात आले आहे. इशिता ‘सारेगामापा’मधील वयाने सर्वात लहान स्पर्धक होती. या सीजनमध्ये जज म्हणून वाजिद खान, शेखर रवजियानी, ऋचा शर्मा यांनी काम पहिले. कार्यक्रमाला आदित्य नारायण यांनी होस्ट केले. अंतिम सोहळ्याला मणिकर्णिका स्टारर कंगना रनौत आणि अंकिता लोखंडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.