आज २०१८ मधील सर्वात स्वस्त पेट्रोल !

0

मुंबई-गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी इंधनाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य मेटाकुटीला आले होते. इंधनाचे दर गगणाला भिडले होते. पेट्रोल-डीझेलच्या किंमतीने तर कहरच केले होते. पेट्रोल शंभरी गाटणार अशी भीती होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. आज २०१८ या वर्षातील सर्वात स्वत पेट्रोल मिळणार आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल आज ७४.४७ रूपये प्रतिलिटर आहे. मुंबईत प्रथमच पेट्रोलने ७५ रुपयांच्या खालील पातळी गाठली आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोल प्रतिलिटर ६८. ८४ रूपये आहे..

काल पेट्रोलदर प्रतिलिटर २२ पैशांनी तर, डिझेलदर प्रतिलिटर २४ पैशांनी कमी करण्यात आले होते. आज यामध्ये आणखी कपात झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ७४.४७ व ६५.७६ रूपये नोंदविण्यात आले. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अनुक्रमे ६८.८४ आणि ६२.८६ रूपये नोंदवण्यात आले आहे.