वैशाली सरदार यांना यंदाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार

निंभोरा ब्रु ||(दीपनगर ):-, भुसावळ तालुकातील निंभोरा येथील महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल कल्याण विभागा चा यंदाचा ग्राम स्तरावरील “पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार वैशाली सरदार. व शारदा वारके या दोन महिलांना देण्यात आला ”

सदर पुरस्कार पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त देण्यात आला आहे. पुरस्कार उपसरपंच च्या उज्ज्वला दिलीप तायडे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला व बाल कल्याण मंत्री यांच्या सहीने सन्मान पत्र व 500/-रोख देण्यात आले. कार्यक्रम चे सूत्र संचालन ग्रामविकास अधिकारी संजय भारबे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उलहास बोरोले, सनी चाहल,प्रकाश सरदार,,कुणाला सुरडकर, विजय तायडे, राजू चौधरी,मीराबाई पवार, रत्ना पाटील, सुरेखा अत्तारदे, शकुंतला तायडे, अंजली मोंडोकार, अलका काळे, सुरेखा बाविस्कर, प्रमिला वरणकर, जिजाबाई पाटील, सुनंदा पाटील, दिलीप तायडे,राजू तायडे, पुष्पक सोनवणे इत्यादी उपस्थित होते.आभार प्रदर्शन ग्रामसेवक संजय भारंबे यांनी केले.