मणिपुर आदीवासी महीलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या व महापुरुषांवर गरळ ओकणाऱ्या संभाजी भिडेस देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करावी : निळे निशानची मागणी

यावल ( प्रतिनिधी ) येथील निळे निशान या सामाजीक सामाजीक संघटनेच्या माध्यमातून मणिपुर येथे झालेल्या भिषण तथा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अत्यंत निदंनिय अशा आदीवासी महीलावरील होत असलेल्या अत्याचार आणी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारशरणीला रोज देशाचे थोर महापुरूषा बाबत गरळ ओकणाऱ्या देशाच्या राष्ट्रगीतास व राष्ट्रध्वजास न मानणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तात्काळ अटक करावी अशा विविध मागण्याचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. निळे निशान या सामाजीक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद म्हटले आहे की , देशातील मणिपुर या राज्यात गेल्या अनेक दिवसापासुन हिंसाचार सुरू असुन या हिंसाचारात आदीवासी महिलांना लक्ष केले जात असुन त्यांच्यावरील होत असलेल्या हल्ले व अत्याचाराने माणुसकीच्या सर्व सिमा ओलांडल्या असुन, त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होत असल्याच्या अत्यंत निंदनिय घटनासमोर आल्या असुन ,या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी ,या शिवाय राज्यात रोज रोज आपल्या मनोविकृत वागणुकीने व वक्तव्याने गरळ ओकुन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यास देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तात्काळ अटक करण्यात यावी व आदी विषयांना घेत निळे निशान संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनावर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , तालुका अध्यक्ष विलास तायडे ,युवक शाखेचे तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल, संघटनेच्या महिला मंचच्या तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे, रावेर / यावल विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष शांताराम तायडे ,तालुका उपाध्यक्ष ईकबाल तडवी , फैजपुर शहर अध्यक्ष आबिद कुरेशी, यावल शहर अध्यक्ष फारूख शेख ,विनोद मेढे, संघटनेच्या युवक शाखेचे तालुका उपाध्यक्ष सुकदेव इंगळे यांच्या स्वाक्षरी आहे .