भुसावळ- वीज चोरी केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एक हजार 673 गुन्हे नाशिकच्या अधिकार्यांनी गुरुवारी वर्ग केले. पाचोरा व भुसावळ विभागातील वीज चोरीसाठी बाजारपेठ पोलीस ठाणे देण्यात आले असून यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकारात सुमारे एक कोटींवर रुपयांची वीज चोरी झाली असून नाशिकच्या पथकाने दिवसभरात ही प्रक्रिया पूर्ण केली. बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, एएसआय पाथरवट व प्रवीण ढाके यांनी याकामी त्यांना सहकार्य केले.
बाजारपेठ पोलिसांकडून या गुन्ह्यांचा आता तपास केला जाणार असून त्याबाबत न्यायालयात संबंधितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. भुसावळ- वीज चोरी केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एक हजार 673 गुन्हे नाशिकच्या अधिकार्यांनी गुरुवारी वर्ग केले. पाचोरा व भुसावळ विभागातील वीज चोरीसाठी बाजारपेठ पोलीस ठाणे देण्यात आले असून यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकारात सुमारे एक कोटींवर रुपयांची वीज चोरी झाली असून नाशिकच्या पथकाने दिवसभरात ही प्रक्रिया पूर्ण केली. बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, एएसआय पाथरवट व प्रवीण ढाके यांनी याकामी त्यांना सहकार्य केले. बाजारपेठ पोलिसांकडून या गुन्ह्यांचा आता तपास केला जाणार असून त्याबाबत न्यायालयात संबंधितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.