धुळे। शिरपूरहून मालेगावकडे गुरांची चोरटी वाहतूक करतांना उपअधीक्षक हिंमत जाधव रांच्रा पथकाने दि.5 रोजी पहाटे कारवाई करुन वाहनासह 29 गुरे पकडली. रा प्रकरणी तीन संशरितांना अटक करण्रात आली आहे. ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्राचा संशर व्रक्त करण्रात आला आहे.
धुळे शहर उपविभागीर पोलीस अधिकारी हिंमत जाधव रांच्रा पथकातील उपनिरीक्षक राम सोनवणे, असई घनशाम मोरे, हवालदार मोहम्मद मोबीन, पंकज चव्हाण, सुनील पाथरवट, निलेश महाजन, दिनेश परदेशी, कबीर शेख, पंकज खैरमोडे, किरण साळवेंनी सापळा रचून शिरपूरकडून रेणार्रा एमएच 15/डिके.2226 रा संशरित वाहनाची तपासणी केली. त्रात 29 गुरे अत्रंत क्रुर पध्दतीने कोंबून भरलेली आढळून आली.रा प्रकरणी निहालखान इलिराजखान, शेख इरफान शेख सुलेमान, शेख अरमान शेख मुसा मालेगाव रांना ताब्रात घेण्रात आले.