जामनेर – तपत कठोरा येथील रहीवासी असलेले पावरा कुटूंब हे संगमनेर येथे कामासाठी जात असतांना पहुर रस्त्यावर मोटारसायकल, रिक्षा आणि आयशरचा आज सकाळी विचीत्र अपघात झाला या अपघातात पावरा कुटूंबातील आई-वडील जागीच ठार झाले तर चिमुकलीला उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच तीची प्राणज्योत मालवली.
आयशर ट्रक क्रमांक( एम.एच.४५/१६९६)ह्या गाडीने पहुरकडून जामनेरकडे जात असताना जामनेर कडून रिक्षा क्रमांक(एम.एच.२०/३१३७) व मोटर क्रमांक(एम.एच.१७/ऐ.पी.७६३७ या दोघं वाहनांना कट मारत जोरदार धडक दिली. रिक्षा पलटी होवुन त्यातील काही प्रवासी जखमी झाले. तर मोटर सायकलवरील बाबूलाल गुलाब पावरा(वय-४०) मंगलाबाई बाबूलाल पावरा(वय-३५) व मुलगी राधा बाबूलाल पावरा (वय-६) यांच्या मोटर सायकलला खुपच जोरदार धडक बसल्याने दोघ पती पत्नीचा जागीच मृत्यु झाला तर राधा हिचा जळगाव येथे तातडीच्या उपचारासाठी नेत असताना मृत्यु झाला.