तीन महिने टीआरपी रेटिंगला स्थगिती; बार्कचा मोठा निर्णय

0

मुंबई: मागील आठवड्यात वृत्त वाहिनींचा टीआरपी घोटाळा समोर आला. यावरून एकच खळबळ उडाली. रिपब्लिक भारत आणि इतर दोन अशा तीन वृत्त वाहिनींचा घोटाळा उघडकीस आला. पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी याविषयी माहिती दिली होती. दरम्यान आता ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (बार्क) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील ३ महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी मोजणाऱ्या यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. पैसे देऊन बातम्या बघितल्या जात असल्याचा हा घोटाळा होता.

टीआरपीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा या चॅनल्सना जाहीरातीचे दर वाढवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात कामी येत असतो. अनेक वृत्तवाहिन्या पैसे देऊन टीआरपी मिळवितात आणि त्याचा जाहिरातीसाठी फायदा करून घेतात. जाहिरातीचे दर टीआरपीवरून ठरविले जातात.