नवी दिल्ली: आजपासून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात पाच वर्ष कॉंग्रेसचा झेंडा फडकणार आहे. या तिन्ही राज्यात आज कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे कमलनाथ आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहे.
राजस्थानमध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.
शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चन्द्रबाबू नायडू, तेजस्वी यादव, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एचडी देवेगौड़ा, एच डी कुमारस्वामी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टालिन, कनिमोझी, फारूक अब्दुल्ला, शरद यादव, दिनेश त्रिवेदी, बाबूलाल मरांडी, हेमंत सोरेन, वी नारायनस्वमी, नवजोत सिंह सिद्धू आदी नेते उपस्थित राहणार आहे.