वाशिम-अकोला महामार्गावर अपघात ; 4 ठार

0

अकोला :- वाशिम-अकोला महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याने रिधोराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण ठार झाले असून 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी) पाहटे ६ वाजेच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी हालवण्यात आले आहे.

लक्झरी बस (क्रमांक 02-6001) अकोल्याकडे जात असताना समोरुन येणाऱ्या आयशर (क्रमांक 68 जी . 0168) कारची समोरासमोर धडक बसली. यावेळी रस्त्याच्या बाजूनं उभा असणाऱ्या ट्रकवर (क्रमांक आर.जे. 26 जी .ए. 3609) दोन्ही वाहने आदळली. या अपघातात आयशर चालक व लक्झरीमधील दिलीप नारायण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.